मलकापूर: ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा नेते भीमराज भाई इंगळे अलीकडच्या काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच हजर असतात आपले नेहमीप्रमाणे कामे उरकून भीमराज इंगळे दिनांक 28 /3 /2023 रात्री आपल्या गाडीने घरी गेले असता MH 02 AV 1695 ( Ford fusion) चांगल्या अवस्थेत होती दिनांक 29 /3 /2023 सकाळी 11 वाजता पाहिले असता गाडीच्या समोरील काचा फोडलेल्या दिसल्या . तरी त्या संदर्भात मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मलकापूर पोलीस स्टेशन करीत आहेत.परंतु मलकापूर मधील नागरिकांचा मालमत्तेच्या सुरक्षितता वरती प्रश्न उपस्थित झाला आहे. अज्ञात गुन्हेगार रात्रीच्या वेळी कटकारस्थानांना मूर्त रूप देण्यासाठी किंवा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी फिरतात हे ताबडतोब निर्देशनात येण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे जेणेकरून असे भ्याड हल्ले होणार नाही. असे अज्ञात गुन्हेगार हे कमकुवत बुद्धीचे आणि कमकुवत बुद्धीच्या लोकांनी प्रेरित असतात तरी आपली आणि इतरांच्या सुरक्षेतेत करिता प्रत्येकाने आपल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे भिमराज इंगळे यांनी सांगितले. जेणेकरून प्रशासनाला त्यांच्यावर जरब निर्माण करण्यास मदत होईल.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा नेते भाई भीमराज इंगळे यांच्या चारचाकी वाहनावर केला अज्ञाताने हल्ला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق