राज्यात १५ मार्चपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सलग चौथ्या दिवशीही मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला. वीज कोसळून विदर्भात दोघांचा व नाशिक जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मराठवाड्यात पाच जणांचा बळी गेला होता. रविवारीही काही भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. सोमवारनंतर मात्र हे अवकाळी संकट सरेल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत मग भरपाई मिळणार कधी, या चिंतेत बळीराजा आहे. दरम्यान, अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची शिंदे सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट भरपाई दिली होती. आताही त्याच धर्तीवर मदत दिली जाईल. त्याची घोषणा राज्य सरकार गुढीपाडव्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात करेल,मराठवाडा : १६ हजारांवर हेक्टर पिकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, व हिंगोली जिल्ह्यात शनिवारीही गारपीट झाली. मराठवाड्यात १५ ते १७ मार्चपर्यंत तब्बल १६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका नांदेड व छत्रपती संभाजीनगरला बसला. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे ८,२७३ व ७,७६२ हेक्टर (३३ टक्के) शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर जिल्ह्यातील नुकसानीची अजून नोंद झाली नाही. या विभागात सहा जणांचे बळी गेले आहेत. ज्वारी, गहू, मका या रब्बी पिकांसोबतच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तसेच गारपिटीचा फटका सुद्धा त्यांना बसलेला आहे यवतमाळच्या हिवरा संगम गावात पाऊस सुरू असताना 32 वर्षीय दीपक चौरे यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर गडचिरोली जिल्ह्यात वीज पडून शालेय विद्यार्थिनीचा बळी गेला अकोला वाशिम अमरावती यवतमाळ बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा सह चंद्रपूर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक निफाड सिन्नर देवळा येवला अवकाळी पावसाने या शहरांना झोडपले. तसेच सिन्नर मध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुराचा मृत्यू झाला खानदेशातील नंदुरबार धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू हरभरा केळी पपई मका हरभरा ज्वारी टरबूज कांद्याचे नुकसान झाले सातपुडा पर्वत रांगेतील तोरणमाळ परिसरातही गारांचा पाऊस पडला जळगाव नगर जिल्ह्यात अवकाळी तडाका बसला
पंचनामे अडकले संपात ;सलग चौथ्या दिवशी गारपिटीमुळे पिके उध्वस्त...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق