मलकापूर: मलकापुर दि 19/3/23 ला ब्राह्मण सभा मलकापुर येथे प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत महिला दिना निमित्य आरोग्य कार्ड, ई श्रम कार्ड, ज्या लोकांचे आयुष्मान भारत स्वाथ योजने अंतर्गत सर्वें मध्ये नोद झाली आहे अश्या व्यक्तिचे कार्ड काढण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंदजी फडके होते तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. अशोकजी व्यास यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ प्रभाताई जोशी तर विप्र नारी शक्ती सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अर्चना सुनील शुक्ला, तालुकाध्यक्ष सौ. निधी विशाल शर्मा व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवर यांच्या हस्ते करण्यातआले.कार्यक्रमाची प्रस्थावना करत असतना निधी शर्मा यांनी संघटनेचे मूल्य उद्देश्य ब्राह्मण महिलांना स्वतंत्र मंच उपलब्ध करुन देने,महिलाच्या समस्या सोडवने, त्यांना आत्मनिर्भर बनवीने, त्यांच्या हिताची रक्षा करने, हिन्दू संस्कृती जनजागृती करने, महिलाच्या आरोग्य विषई काळजी घेणे, विधवा महिला यांचे लग्न जुड़वणे, सेवा कार्य करने हा आहे व ते लक्षात घेऊन आज जन आरोग्य शिबीर आयोजन केले आहे उपरांत एडवोकेट अर्चना शुक्ला यांनी महिला दिना निमित्य उपस्थित महिला यांना आजच्या युगातील मूलींना शिक्षणा सोबत आपल्या धर्म,रूठी,परंमपरेचे महत्व सांगून त्यांचे जतन करुण त्यांचे पालन करने गरजेचे आहे असे झाल्यास आपल्या परिवारा सोबत देशाचे भविष्य हे निश्चित उज्वल होईल.
डॉ. राजेंद्रजी फडके यांनी बेटी बचाव व बेटी बढावो या विषवर उपस्थित महिला यांना मार्गदर्शन केले स्त्री- पुरुष भेदभाव टाळा असे आव्हान केले.आज समाजा पासून देशा पर्यत योग्य घडवन्याचे कार्य महिला करत आहे आज प्रत्येक श्रेत्रा मध्ये महिला ह्या पुरुषा पेक्षा कमी नाही यांची जान उपस्थित महिला यांना कार्यक्रमच्या अध्यक्षा प्रभाताई जोशी यांनी करुण दिली.प्रमुख पाहुण्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नाव नोदणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिर मध्ये 230 समाज बंधु-भगिनी चे अयोग्य कार्ड तर 65 लोकांचे ई- श्रम कार्ड काढण्यात आले सदर स्वास्थ योजनेचे फायदे श्रुतीताई तूपकारी यांनी उपस्थित समाज बंधु-बघिनी यांना सांगितले तर कार्यक्रमा करीता लाभलेले मान्यवर तसेच कार्यक्रमा करीता ब्राह्मण सभेची जागा उपलद्ध करुण दिल्या बदल ब्राह्मण सभा अध्यक्ष नरेशजी देशपांडे,साउंड करीता शरद शर्मा यांनी सहकार्य केल्या बदल त्यांचे आभार अनघा घिर्निकार यांनी मानले तर सूत्र संचलन नीताताई डाफने यांनी केले. महिला व मुलीचे धर्म संस्कृती बदल ज्ञान वाढवे या दृष्टीने प्रश्न मंजूषाचे आयोजन शिबिरा सोबतच संस्था द्वारे करण्यात आले होते
إرسال تعليق