बुलढाणा: शासकीय कर्मचारी एवढा त्रास देता की शेतकऱ्यांना पैशांचे डबे घेऊन त्यांच्यापर्यंत जावे लागते सहा दिवसात होणाऱ्या कामाला सहा सहा महिने लावतात एवढा माज कर्मचाऱ्यांना चढलाय मला सांगा कोणचा कर्मचारी पगारावर डिपेंड आहे 95 टक्के कर्मचाऱ्यांजवळ हरामाची कमाई आहे ते गडगंज झाले आहेत त्यांच्या घरात प्रॉपर्टी खूप झालेली आहे असा खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वादग्रस्त विधान केले. त्यामुळे कर्मचारी विरुद्ध आमदार संजय गायकवाड असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 14 मार्चपासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत खासदार ,आमदारांची ही पेन्शन बंद करा अशी मागणी कर्मचाऱ्याकडून होऊ लागल्याने आमदार संजय गायकवाड यांनी मिळणाऱ्या पेन्शन पेक्षा आम्हाला पाच लाखांचा खर्च करावा लागतो असे कर्मचाऱ्यांना सुनावले आमदार गायकवाड म्हणाले मुख्यमंत्री उदार आहेत देण्यासाठी तयार आहेत पण एका फटक्यात निर्णय होऊ शकत नाही कारण यावेळी हा निर्णय घेतला तर जे नवीन सरकार येणार ते कोलमडून जाईल पाच टक्केच कर्मचारी इमानदार असल्याचे सांगत गायकवाड म्हणाले की 95 टक्के मध्ये चपराशीही सुटत नाही तो देखील आत जायचे शेतकऱ्याला पैसे मागतो लोक ऑफिसमध्ये गेल्यास कर्मचाऱ्यांची लोकांच्या खिशाकडे नजर राहते की हा किती पैसे काढेल म्हणून खरोखर इमानदारीने पेन्शन हवी असेल तर कर्मचाऱ्यांनी शपथ घ्यावी कोणाकडूनच रुपयाही खाणार नाही सरकारचे नुकसान होऊ देणार नाही सरकारचा पैसा सरकारी तिजोरीत जाऊ देऊ तेव्हाच सरकारची तिजोरी भरेल आणि मग यांना शासन पैसे देईलआमदार गायकवाड म्हणाले सरकारला लुटायचे सरकारचे पैसे खायचे योजना गडप करायच्या लोकांना त्रास द्यायचा आणि मोठ्याने सांगायचे पेन्शन द्या म्हणून आधी लायकी सिद्ध करा असे आमदारांनी सांगूनही हे कर्मचारी काम करीत नाही खरोखर कर्तव्य जर पडलं तर असे इंग्रजांच्या काळात कोणी रुपया खात नव्हता तशी शपथ घ्यावी की या देशात कधीच पैसा खाणार नाही शेतकऱ्यांना त्रास देणार नाही काम वेळेत करू तेव्हाच आम्ही सांगू त्यांना जुनी पेन्शन द्या असे आमदार गायकवाड म्हणाले.
कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई ! आ.संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने नवा वाद...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق