Hanuman Sena News

गाई विक्रीच्या नावाखाली बजरंग दल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस व बजरंगदलाचे लोगोचा वापर करून अज्ञात भामट्याकडून म्हैसवाडी येथील तरुणाची फसवणूक...


मलकापुर: मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील देवेंद्र शरद चौधरी वय 23 वर्ष या तरुणाला इंस्टाग्राम वर 'सोनू जाट डेअरी फार्म' या जाहिराती नुसार गाई विक्रीचा व्यवसाय सांगून गंडवल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात भामट्याविरुद्ध सायबर शाखा बुलढाणा येथे तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.देवेंद्र चौधरी राहणार म्हैसवाडी वय 23 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मोबाईल क्रमांक 9112781730 असून याचे व्हाट्सअप नंबर व इंस्टाग्राम वर अकाउंट आहे. तेव्हा इंस्टाग्राम वर सोनू जाट डेअरी फॉर्म नावाचे पेज ज्यावर दुग्ध गाईंची जाहिरात केली होती. जाहिरातीत मोबाईल क्रमांक 9040067940 असा होता. मी संपर्क केला असता चांगल्या गाईचे फोटो,व्हिडिओ संबंधिताने पाठवले त्यातील दोन गाई आवडल्याने 85000/-असा सौदा झाला सदर गाई पोहोचून देण्याचे प्रत्येकी तीन हजार प्रमाणे सहा हजार सौदयातून कमी करण्याचे सुद्धा सांगीतले गेले. त्यानुसार संबंधित भामट्याने आशु मॅनेजर उल्लेख केलेले व ललता गौंड उल्लेख केलेले 'क्युआर कोड' पाठवले तेव्हा मी ललता गोड यांच्या क्युआर कोड वरती 3000/- रुपये पाठवले असता त्यांनी व्यवहाराचे बिल मला पाठविले ज्यावर बजरंग दलाचा लोगो आणि बजरंग दल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असे लिहिलेले असल्याने माझा पूर्ण विश्वास बसला त्यानंतर ठरल्याप्रमाणे 3000/- रुपये रक्कम सुद्धा मी पाठवली. दुसऱ्या दिवशी गाई कुठपर्यंत पोहोचल्या याची विचारणा केली असता मध्यप्रदेश खैरगोन असे सांगितल्या गेले तसेच गाडीचा जीपीएस खराब झाल्याने ड्रायव्हरला तुमचे लोकेशन दिसत नाही. तेव्हा तुम्ही ललता गोंड यांच्या 9091990184 या क्रमांकावर 25500 पाठवा असे सांगितले गेले.मला संशय आल्यावर मी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री सुयोग शर्मा यांच्याकडून चौकशी केली असता बजरंग दलाचा असा कुठलाही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस नसल्याचे कळाल्याने सदर बिल खोटे व फसवीगिरीचे असल्याची खात्री पटल्यावर मी रक्कम पाठवण्यास नकार दिला तर नंतर पंधरा मिनिटांनी 6313637183 या व्हाट्सअप नंबर वरून मला व्हाट्सअप कॉल येऊन तुमच्यावर कारवाई केली असल्याचे हिंदी मध्ये सांगितले;पुन्हा याच नंबर वरून व्हिडिओ कॉल आला ज्यामध्ये राजस्थानचे पोलीस कर्मचारी दिसले व त्यांनी मला लगेच 25500/- भरावे लागतील अन्यथा दोन तासाच्या आत अटक करण्यात येईल अशी धमकी दिली बजरंग दल संघटनेचे कुठलेही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस अथवा गाई विक्री असा व्यवसाय नसल्याने संघटनेच्या नावाचा वापर करून तसेच संघटनेचाच हा उपक्रम असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याने नागरिकांनी अशा व्यवहारास बळी पडू नये असे सावधानतेचे आवाहन बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक ॲड अमोल अंधारे यांनी केले आहे .अशा प्रकारच्या हकीकत वरून बजरंग दलाच्या नावाचे ट्रान्सपोर्ट सर्विस व लोगो तसेच शासकीय कर्मचारी भासवून सहा हजार रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद चौधरी यांनी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे दिली.सदर फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 507, माहिती तत्त्वज्ञान अधिनियम प्रेमाने 2008 66c,66d असा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم