बुलढाणा: बुलढाणा शहरात प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम सुरू करण्यात आली आहे .मात्र या मोहिमेमुळे छोटे व्यवसायिक फेरीवाले यांचा रोजगार हिरावला जात आहे. प्रशासन गरिबाच्या पोटावर पाय देत असल्याची प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत असतानाच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ फूटपातवरील व्यावसायिकांसाठी पुढे आले आहेत.नगरपालिकेने सुरू केलेले अतिक्रमण हटवा मोहीम थांबवण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी सपकाळ यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढले, बुलढाणा नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले. नगरपालिकेने स्वतःचा भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करणे अपेक्षित असताना नगरपालिका मात्र गरिबांच्या आयुष्याची खेळत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. फेरीवाल्यांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत हाॅकर्स झोन जाहीर करून तिथे व्यावसायिकांना दुकाने लावण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तशीच आहेत मात्र छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण धारक ठरल्या जात असल्याकडे सपकाळ यांनी माध्यमांचे लक्ष वेधले शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हे सगळे दोन नंबरचे धंदे अतिक्रमित जागेत चालतात. मात्र त्यांचे अतिक्रमण काढण्याची हिंमत प्रशासन करेल का ? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. सध्या सणांचे दिवस आहेत यावर व्यावसायिकांनी विकण्यासाठी सामान आणलेले आहेत. ते त्यांना विकू द्यावे सुरू असलेली कारवाई थांबवावी दोन दिवसात नगरपालिका प्रशासनाने कारवाई थांबवली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे सपकाळ म्हणाले. एक तर कारवाई थांबवा नाही तर ज्यांची दुकाने काढून टाकले त्यांना उपजीविकेसाठी वरली मटक्याची दुकाने लावू द्या असा उपरोधिक टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला
मोहीम थांबवा नाहीतर त्यांना पोट भरायला वरली मटक्याची दुकाने लावू द्या- हर्षवर्धन सपकाळ
Hanuman Sena News
0
إرسال تعليق