सुयोगजी शर्मा
विशेष प्रतिनिधी,
मलकापूर : 22 मार्च 2023 रोजी विप्र जागृती महिला मंडळा तर्फे भगवान शिव-पार्वतीला समर्पित गणगौर उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करुन अखंड सुहागा करीता भगवान शिव माता पार्वती यांना नवस करण्यात आले.या उत्सव निमित्त शरातून राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या महिला द्वारे भव्य शोभा यात्रा गजानन महाराज मंदिर सांस्कृतिक पध्दतीने सुरू होऊन नीमवाडी चौक, सिनेमा रोड, हनुमान चौक, बिर्ला रोड, बिर्ला मंदिर येथे समारोप करण्यात आली.शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण इसरजी गणगौरजी यांची सजवलेली पालखी ठरली . या शोभा यात्रेत राजस्थानी ब्राह्मण समाजातील महिला व नवयुवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.गणगौर हा असा सण आहे जो प्रत्येक सुहासिनी स्त्री साजरा केरते.यामध्ये अविवाहित मुलगी आणि विवाहित महिला दोघेही गणगौरची पूर्ण विधीपूर्वक पूजा करुण व्रत करतात, ज्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. इसरजी गौराजी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा विधिवत केल्या जाते. या पूजेचे महत्त्व अविवाहित मुली उत्तम नवरा मिळावा, तर विवाहित महिलेसाठी, तिच्या पतीच्या दीर्घायुष्य कामना केली जाते. विवाहित स्त्री सोळा दिवस सोळा अलंकार घालून पूजा, व्रत करते. - सौ.कोमल सुयोग शर्मा.
إرسال تعليق