Hanuman Sena News

डिझेल भरण्यासाठी उसने दिलेले पैसे परत मागणे पडले महागात ! ...










खामगाव: डिझेल भरण्यासाठी उसने दिलेले पैसे परत मागणे एकाला महागात पडल्याची घटना गावच्या सजनपुरी येथे घडली आहे रमेश सुरेश सपकाळ वय 31 वर्ष राहणार सजनपुरी खामगाव याने पवन सुभाष पवार राहणार सजनपुरी खामगाव याला काही दिवसापूर्वी त्याच्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी 730 रुपये उसने दिले होते ते उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी रमेश सपकाळ हा 29 मार्चच्या रात्री अकरा वाजता च्या दरम्यान पवन पवार च्या घरी गेला होता तेव्हा पवन पवारांने सकाळी पैसे देतो असे सांगितले. तेवढ्यात सपकाळ आपल्या घरी परत जात होता तेव्हा पवन पवार याचा भाचा शिवप्रमोद पाटील हा तेथे आला त्याने सपकाळ यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली पवन पवार यांनी सपकाळ याला पकडून ठेवून शिवा पाटील यांनी सपकाळ यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केले सपकाळ यांच्या तक्रारीवरून व मेडिकल सर्टिफिकेट वरून शिवाजीनगर पोलिसांनी पवन पवार व शिवा पाटील या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास नपोकॉ राठोड करीत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم