Hanuman Sena News

आता मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातही होणार डायलिसिस...







 मा.आ.चैनसुख संचेती यांच्या मागणीला यश.

मलकापूर: मलकापुरातील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलीसीस सेंटर व  सिटीस्कॅन सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार चेनसुखजी संचेती यांनी शासन दरबारी लावून धरली होती. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर निर्मिती प्रकरणी प्रशासकीय मान्यता बाबतचे आदेश काढले आहे 2021 च्या जनगणनेनुसार मलकापूर तालुक्यातील लोकसंख्या 1 लाख 78 हजार असून तालुक्यात एक ना.आ.केंद्र दोन प्रा.आ केंद्र व 18 उपकेंद्र आहेत तसेच हा परिसर खारपट्ट्यामध्ये येत असल्यामुळे पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे आजारांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे नव्याने डायलिसिस सेंटर व  सिटीस्कॅन सेंटर सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे सदर सेंटर सुरू झाल्यास मलकापूर तालुक्याबरोबरच मोताळा, नांदुरा ,बोदवड व इतर तालुक्यामधील रुग्णांनाही याचा लाभ होईल. उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलिसिस सेंटर व सिटीस्कॅन सेंटर सुरू करण्यासाठी जागेची उपलब्धता आहे तर परिसरातील रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभारणी करणे आवश्यक असल्याचे महत्त्व माजी आमदार चेनसुखजी संचेती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या निदर्शनास आणून दिले त्याचप्रमाणे या मागणीच्या पूर्तते करिता सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला परिणामतः या पाठपुरावाला यश आले त्यामुळे परिसरातील रुग्णांना आता डायलिसिसच्या माध्यमातून उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم