बुलढाणा : क्रीडा संकुल परिसरासह म्हाडा कॉलनी मिर्झा नगर परिसरात दिसणारा बिबट्या आता मलकापूर मार्गावर नागरिकांना दिसला आहे. त्यामुळे या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 21 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा बिबट्या मलकापूर महामार्गावरील एका हॉटेलजवळ दिसून आला यापूर्वी म्हाडा कॉलनीच्या परिसरातून कुत्र्याची पिल्लू बिबट्याने पळवले होते तसेच या भागात अस्वलांचा वावर दिसून आला आहे हनवतखेळ महामार्गावरील कचरा डेपो परिसरात अस्वलांचा वावर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. आरटीओ ऑफिस च्या मागील भागातुन एका घरातून बिबट्याने थेट बकरीच उचलून नेल्याची घटना गेल्या दोन महिन्यापूर्वी घडली होती. दुसरीकडे प्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या वनामध्ये वाढती उन्हाळ्याची तीव्रता पाहता पाण्याची उपलब्धता नसल्याच्या पार्श्वभूमीवर बिबट व अस्वल या भागात येत नसावेत ना ! अशी शंका व्यक्त केली जात आहे त्यातच बुलढाणा शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असून आता जुन्या खडकी रोड पर्यंत वसाहत पोहोचली आहे. मलकापूर रोडवर नव्याने खालीद बिन वलीद नगर आकारास आले आहे. हा भाग थेट जंगलाला लागून आहे त्यामुळे या भागात सहज मिळणाऱ्या शिकारीमुळे हींस्त्र श्वापद वळले नाहीत ना! अशी चर्चाही आहे. अलीकडील काळात हिंस्त्र श्वापद दिसण्याच्या वाढलेल्या घटना पाहता सुरक्षतेसाठी वन विभागाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
बुलढाण्यात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق