मलकापूर: मलकापूर दि.१८ मार्च २०२३ रोजी मलकापुर शहर व तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न महिलांना 'सुषमा स्वराज' पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्यक्रम ठरविले होते.आजच्या युगाची प्रगती म्हणजेच स्त्री. या स्त्रीशक्तिच्या हक्कांचे रक्षण व स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनातुन शनिवार दि. १८/०३/२०२३ रोजी महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तिकरण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. उज्ज्वलाताई संचेती तसेच प्रमुख पाहुणे सौ. कल्पनाताई म्ह्स्ने या होत्या. त्याचप्रमाने सौ.अर्चनाताई शुक्ला व सौ.डॉ. निलीमाताई झंवर , सौ.अश्विनीताई काकडे पाटील या देखील उपस्थित होत्या.सर्व मान्यवरांच्या हस्ते एकुण २० महिलांना 'सुषमा स्वराज ' पुरस्कार प्रदान करण्यात आले. व त्यांना सन्मानित करण्यात आले.श्री.चैनसुखजी संचेती यांनी कार्यक्रमाची सुरवात मोठ्या जोशाने करुन शोभा वाढ़वली. तसेच सौ.कल्पनाताई यांनी सर्वाना मार्गदर्शन केले तसेंच बस सेवेचे ५०% सूट विषयी महिलाना जागृत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गीताताई खोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अश्विनिताई काकडे यांनी केले.तरी सर्व महिला आवर्जून उपस्थित राहुन महिला शक्ति चे उत्तम उदाहरण दिले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाकरिता महीला मोर्चाच्या तालुका व शहर सर्व महिला सदस्यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق