Hanuman Sena News

अल्पवयीन कुमारिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल






नांदुरा: नांदुरा तालुक्यातील अल्पवयीन कुमारिकेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार रोजी समोर आली या प्रकरणी तिच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील एका अल्पवयीन कुमारीकेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये आरोपी कलीम शाहा याने पीडित अल्पवयीन कुमारीकेला  नांदुरा शहरातील एका घरासमोरून जबरदस्तीने दुचाकी वर बसविले. नांदुरा - मलकापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील सांगवा गावाजवळील झाडीमध्ये नेऊन विनयभंग केला .पिडितेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कलीम शाहा याच्या विरुद्ध पाॅस्को अधिनियम 2012 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला .अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले साहेब करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم