मलकापूर: मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवर आदर्श नगर जवळ असलेल्या साई लक्ष्मी अगरबत्ती दुकानातील महिलेची अज्ञात चोरट्यांनी पोत ओढून नेल्याची घटना आज दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की सौ.लक्ष्मी मूलचंद काकडे वय वर्षे 50 राहणार साईनगर यांचा अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय आहे बुलढाणा रोडवरील आदर्श नगर जवळील ही महिला नेहमीप्रमाणे दुकानांमध्ये असताना वानखेडे पेट्रोल पंप कडून येणाऱ्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानात येऊन मला अगरबत्ती द्या असे म्हटले असता महिलेने मागच्या बाजूने वळले असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत 15 ग्रॅम किंमत 90 हजार रुपयाची ओढून घेऊन पसार झाला ही महिला दुकानाच्या बाहेर येण्या अगोदर चोरट्यांनी दुचाकी वर बसून बस स्थानकच्या दिशेने पसार झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली मलकापूर शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून चोरटा पसार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق