विशेष प्रतिनिधी,
चेतनआप्पा जगताप
मलकापूर: रामवाडीला कोणी वाली आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे प्रभाग क्रमांक तीन मधील रामवाडी येथील खंडारकर यांच्या घराजवळील नालीचे खोदकाम करून आठ ते दहा महिने होत आले आहे. साधारण नालीचे खोदकाम पाच फूट आणि रुंदी चार फूट आहे. यामध्ये पूर्ण एरियातील खराब आणि साचलेला पाणी आहे. त्यामुळे मच्छर व इतर साथीचे रोग होत आहे. त्यापेक्षा विलक्षण म्हणजे त्या पाच फूट नाली मध्ये धुलीवंदनच्या दिवशी एक चिमुकला पडला तिथे असलेले नागरिक जमा होऊन त्यांनी त्याला वाचवले नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन फोटो पाठवून तरी सुद्धा कोणीही त्यावर कोणतीच ॲक्शन घेत नाही नगरपालिका कोणाचा जीव जाईन तो पर्यंत वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल रामवाडी मधील नागरिक करीत आहे. राजकीय मंडळी रामवाडी या भागाला विसरले की काय रामवाडी हा नगरपालिकेतला हिस्सा आहे आणि यांचे मतदान नगरपालिकेमध्ये आहे हे विसरत आहेत का अशी खमंग चर्चा रामवाडी मधील नागरिकांमध्ये रंगू लागले आहे जर त्या नाल्यामध्ये पडून कोणाचा जीव गेला तर त्याला सर्व जबाबदार नगरपालिका राहील याची नोंद नगरपालिका प्रशासनाने घ्यावी व त्वरित नालीचे राहिलेले बांधकाम पूर्ण करावे किंवा नालीमध्ये साचलेले तुडुंब पाणी निकामी करावे व रामवाडीतील नागरिकांना योग्य न्याय मिळावा याची दखल घ्यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू
إرسال تعليق