मलकापूर: आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत सन 2021 22 च्या कामगिरीच्या आधारे मलकापूर तालुक्यातून अनुराबाद गावाला प्रथम क्रमांक चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या मलकापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे कामांचे मूल्यमापन बुलढाणा येथून झालेल्या मूल्यमापन समितीच्या अगोदर प्रत्यक्ष भेट देऊन केले गेले. त्यामध्ये अनुराबाद ग्रामपंचायतीला सर्वात जास्त गुण प्राप्त झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मलकापूर तालुक्यातील अनुराबाद गावाची प्रथम क्रमांक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पंचायत समितीचे सर्व अधिकारी अनुराबादचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, तरुण युवक ,सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने अनुराबाद गावात केलेल्या विविध प्रकाराचा सर्वांगीण विकास तसेच मराठी शाळेमध्ये सुंदर शाळा व अंगणवाडी इमारत बांधकाम मराठी शाळेत व अंगणवाडीमध्ये सर्व प्रकारच्या शालेय उपयोगी वस्तू शाळा परिसर सुंदर स्वच्छ सुसज्ज, स्मशानभूमी, वृक्ष लागवड तसेच सर्व प्रकारचे अनुराबाद गावाचे शेती संदर्भात विविध योजना, नदी खोलीकरण, गावातील अंतर्गत रस्ते, नाल्या विविध आरोग्य शिबिर राबविणे, कोरोना काळात विविध आरोग्याच्या उपायोजनात तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजना प्रभावीपणे राबविल्या त्यामुळेच मलकापूर तालुक्यातील अनुराबाद गावाला प्रशासनाच्या वतीने मलकापूर तालुक्यात प्रथम क्रमांकाचा आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला.
आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत 2021-22 मलकापुर तालुक्यातून अनुराबाद गावाला प्रथम पुरस्कार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق