Hanuman Sena News

मलकापूर शहरातील अवैध धंदे बंद करावे...भाजपा दलित आघाडी










मलकापूर: गेल्या काही दिवसापासून मलकापूर शहरांमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू असून अनेक भागांमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम, ऑनलाईन लॉटरी, वरली मटका, जुगार अवैध दारू विक्री सारखे अवैद्य व्यवसाय जोमाने सर्रासपणे खुलेआम सुरू आहेत या अवैध व्यवसायामुळे शाळेतील शाळकरी मुले व इतर लहान मुले हे अवैध व्यवसायाकडे वळत आहेत त्यामुळे त्यांच्या बालमनावर त्यांचा विपरीत परिणाम होण्याबरोबर भावी पिढी ही अशा प्रकारच्या व्यसनाकडे वळत आहे या सर्व अवैध व्यवसायांना वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली असून भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे असे भाजपा दलित आघाडीचे शहर अध्यक्ष कुणाल सावळे यांनी सांगितले.मलकापूर शहरातील अवैध धंदे तातडीने बंद करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून शहरातील सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अन्यथा दिनांक 28/ 2 /2023 पासून लोकशाही मार्गाने नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी.

Post a Comment

أحدث أقدم