Hanuman Sena News

सुप्रिया सुळेंचं आवाहन मी स्वीकारतो; त्यांनी वेळ आणि तारीख सांगावी-आ. नितीश राणे










मुंबई - लव्हजिहाद कायदा व्हावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी हिंदु आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुंबईतही अलिकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी मोर्चा काढला होता. मात्र लव्ह जिहादची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय जर कुणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे असं विधान करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी खुलं आव्हान स्वीकारलं आहे.आमदार नितेश राणे म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी जे काही सांगितले मी लव्ह जिहादवर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे. लव्ह जिहाद कशाला म्हणतात. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जाते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे, संबंधित मुलींना भेटवण्यापासून मी द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितले.तसेच कुणी कुणासोबत लग्न करणे यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने प्रेमाच्या नावाने आधी तो अमर होतो त्यानंतर अमीन होतो याला प्रेम प्रकरण म्हणत नाही. लग्नानंतर तुम्ही हिंदू भगिनींना नाव बदलायला सांगता. इस्लाम कुराण वाचायला सांगतात. तिला हिंदू सण साजरे करण्यास बंदी केली जाते. बळजबरीनं धर्मांतर केले जाते. जेव्हा धर्मांतर करत नाही तेव्हा तिला मारून टाकण्यापर्यंतची असंख्य उदाहरणे आमच्या महाराष्ट्रात आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं.दरम्यान, सुप्रियाताईंना त्यांच्या ज्ञानात भर टाकायची असेल तर त्यांनी तारीख, वेळ ठरवावी. लव्ह जिहाद नेमकं कसं होतं? यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य कसं बर्बाद होते. त्याचे सगळे पुराव्यासकट सांगायला तयार आहे असं आव्हान देत हे ऐकल्यानंतर सुप्रिया सुळेही आमच्यासोबत लव्ह जिहादचं हे आव्हान पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. लव्ह जिहाद हा गंभीर विषय असून मी गेल्या काही दिवसापासून त्यावर मनमोकळे बोलतोय राज्यात मोर्चे काढण्याची एक नवीन पद्धत निघाली आहे हे मोर्चे तुम्हाला फक्त सांगतात की काय खायचं लग्न कोणाशी करायचं एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहोचली जाते लव जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही लव्हजिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं

Post a Comment

أحدث أقدم