मलकापूर: अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्या प्रकरणातील 22 वर्षीय संशयीचा मृत्यू झाल्याने शुक्रवारी उघड झाले दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी परत आल्याचे नांदुरा ठाणेदार अनिल बेहरांनी यांनी सांगितले मृत संशयित वेदांत सपकाळ यांच्या पार्थिवावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी मृतकाच्या नातेवाईकांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नांदुरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची तक्रार 15 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली होती. त्यात वेदांत सपकाळ संशयित असल्याचे समोर आले होते .दरम्यान त्याचा मृतदेह पेट्रोल केमिकलच्या टाक्यात सापडला होता त्यामुळे या प्रकरणाचे गुड वाढले होते. त्यातच आता ती अल्पवयीन मुलगी परत आली आहे ती तिच्या आत्याकडे होती अशी माहिती तिने पोलिसांना दिल्याचे नांदुऱ्याचे ठाणेदार यांनी सांगितले आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.
पळवून नेलेली ती अल्पवयीन मुलगी परतली...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق