मलकापुर : गौरक्षकावर कट रचुन हल्ला करण्याऱ्यावर कठोर कार्यवाही करुण हल्ले खोरांच्या घराची झडती घ्यावी विश्व हिन्दू परिषद बजरंग दल ची मागणी मालेगाव जिल्हा नाशिक येथील विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते व गौरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा जाहीर निषेध व हल्ले खोरावर कायदेशीर कडक कारवाई करणे बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ रावजी शिंदे आणि मा. ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत दिनांक 7 फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान सेना,शिवसेना, भारतीय जनता पार्टी व शेतकरी संघटना तथा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज उपविभागिय अधिकारी साहेब मलकापुर यांचे मार्फ़त निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मालेगाव जिल्हा नाशिक येथील विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते व गौरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर समाज कंटकांनी यांनी कट रचून भ्याड हल्ला केला मध्ये सदर गौरक्षकाची प्रकृति गंभीर स्थितीत आहे. या घटनेचा आम्ही सकल हिंदू संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो व हल्लेखोला विरुद्ध दंडात्मक कारवाई व्हावी. व हल्लेखोर यांच्या घराची झडती घेण्यात यावी अशी मागणी करतो.मच्छिंद्र शिर्के हे गाईचे रक्षण व प्राणी संरक्षणार्थ सतत झटत आहे. महाराष्ट्रात गोवंश रक्षणाचा कायदा आहे. याचा अर्थ हे मच्छिंद्र शिर्के कायद्याचे संरक्षणाकरिता झटत असताना त्यांना सुरक्षा पुरविणे हे शासनाचे कर्तव्य होते. या पूर्वी सुद्धा समाजकंटकांनी अशाच प्रकारचे प्राण घातक हल्ले केलेले आहे.पण आता त्यांच्या वर असे प्राणघातक हल्ले वारमवार होत असल्याने मच्छिंद्र शिर्के यांच्या संरक्षणार्थ झेड प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाने उचलावा, तसेच या हल्या द्वारे त्यांचे झालेले आर्थिक व शारेरिक नुस्कान भरपाई म्हणून 10 लाख रुपये हल्लेखोरा कडून किंवा शासनाने अनुदान म्हणुन द्यावे.मालेगाव तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बरेच वेळात बेकायदेशीर रित्या गोवंशाचे वाहतूक व कत्तल होत असते ते रोखण्यासाठी पोलिसांना सत्य निर्देश द्यावे गोवंश रक्षणाचा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांना सत्य निर्देश द्यावे तसेच महाराष्ट्रात गो वंशाची निर्दयपणे वारंवार होणारी अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
या निवेदनावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान सेना,शिवसेना, भारतीय जनता पार्टी,शेतकरी संघटना व इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
إرسال تعليق