Hanuman Sena News

बुलढाण्यात माजी जिल्हा परिषद सदस्यविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल...








   

बुलढाणा: ठोक्याने घेत असलेल्या शेतात हरभरा सोंगत असताना तीन जणांनी येऊन महिलांना काठीने मारहाण केले महिलांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला अशा तक्रारीवरून माझी जिल्हा परिषद सदस्यविरुद्ध व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला येळगाव शिवारात ही घटना घडली बुलढाणा शहरातील जोहर नगर भागात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे तक्रारीनुसार महिलेने येळगाव शिवारातील प्रितेश संचेती यांचे शेत ठोक्याने केले आहे. या शेतात त्यांनी हरभरा पेरला होता महिला मजुरांना सोबत घेऊन हरभरा सोंगत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिनकर त्यांच्या वडील व मुलासह ते शेतात पोहोचले. तुम्ही हरभरा कसा काय सोंगत आहात असे विचारले असता सिनकर परिवारातील तिघांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली याशिवाय महिलेच्या १२ वर्षीय मुलीला बाजूला ओढत तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणा नंतर महिलेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم