पुणे : चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. लक्ष्मण जगतापांच्या पत्नी की त्यांचे बंधू यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळेच अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केली नाहीये. असं असतानाच आज लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांनी एक पाऊल पुढं टाकलं आणि उमेदवारी अर्ज घेत, उमेदवारीवर दावा केला. त्यानंतर भाजपच्या त्याच अधिकृत उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. त्याचवेळी दिवंगत लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी भाजपसाठीच उमेदवारी अर्ज घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीत शंकर जगतापांचे नाव आलेच नाही. जगताप कुटुंबातून एकाच उमेदवाराचे नाव निवडणुकीसाठी समोर येईल अशी अपेक्षा होती. पण दोघांनी ही उमेदवारीवर दावा ठोकल्याने जगताप कुटुंबातील वादाचा पहिला अंक जाहीरपणे समोर आला असल्याची चर्चा आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारीच जगताप कुटुंबियांशी बंद दाराआड चर्चा केली. ही भेट सांत्वनपर होती असं शंकर जगतापांनी स्पष्ट केलं होतं. पण फडणवीस हे दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि भावातील वाद मिटविण्यासाठीच आले होते, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.त्यावेळी शंकर जगताप म्हणाले होते की, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शोक सभा झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना घरी यायचं होतं. कुटुंबियांची भेट घ्यायची होती. त्यांनी त्यासंदर्भात माहितीदेखील दिली होती. त्यानुसार त्यांनी आमची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पोटनिवडणुकी संदर्भातदेखील कोणतीही चर्चा झाली नाही, असं सांगण्यात आलं होतं. फडणवीसांनी लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या लक्ष्मण जगताप यांच्या कामाचं कौतुक केलं त्यांनी एखादं काम हाती घेतलं की पूर्ण करायचे असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या कामाची पद्धत सांगितली होती.महाविकास आघाडीतही अलबेला नाही भाजपाचा हा तिढा सुरू असताना महाविकास आघाडीत देखील काही अलबेला नसल्याचे चित्र आहे मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी बैठक होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा नेमका कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबातील वाद; पत्नी आणि भावाकडून भाजपाच्या उमेदवारीवर दावा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق