बुलढाणा: ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी बुलढाणा शहरातील कारंजा चौक तिरुपती मंगल कार्यालय येथे अग्रसेन सेवा समिती बुलढाणाच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी छत्रपती श्री अग्रसेन महाराज यांच्या स्मारकासाठी ५० लक्ष,रुपयाच्या तरतुदीची घोषणा केली आणि निधी कमी पडू देणार नाही असे सुद्धा सांगितले, तसेच शहरातील प्रेक्षणीय ठिकाणी लवकरच अग्रेसन महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाईल असे सांगितले
यावेळी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा मा. राधेश्यामजी चांडक यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांना " महावीर " अशी उपमा दिली.कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर श्री गोवर्धनदासजी भडेच, अनिलजी अग्रवाल, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, श्री अशोकजी अग्रवाल, गोपालदासजी अग्रवाल, विनोदजी केडिया, डॉ. दिनेशजी अग्रवाल, श्री संदीप अग्रवाल, श्री राजेशजी अग्रवाल, कुणाल अग्रवाल, श्री भिकाजी दालमिया, श्री पप्पू सेठ अग्रवाल, श्री बबलू सेठ अग्रवाल, श्री महेशजी अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्रजी दांदडे, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पृथ्वीराज संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, माजी नपा उपाध्यक्ष विजय जायभाये, उमेश कापुरे, मुन्नाजी बेंडवाल, मोहन पऱ्हाड, गोविंदा खुमकर, मनोज यादव, दीपक तुपकर, निलेश पाटील,विजय काळवाघे, ज्ञानेश्वर खांडवे,, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
إرسال تعليق