Hanuman Sena News

आमदार फुटणार आहेत हे, आधीच आम्ही उद्धव ठाकरेंना कळवलं होत-अजित पवार.












शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून राज्यानं ऐतिहासिक सत्तांतर पाहिलं. नवं सरकार सत्तेत येऊन आता काही महिनेही उलटले आहेत. पण असं असतानाही सत्ताधारी पक्षाला इतक्या मोठ्या बंडाची जराशीही कल्पना नव्हती यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.आमदार फुटणार आहेत हे आधीच कळलं होतं. तसं उद्धव ठाकरेंना आम्ही कळवलं देखील होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली."दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप १५-१६ आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील", असं अजित पवार म्हणाले."नेतृत्त्वानं आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला पूर्णपणे तडा देण्याचं काम यानिमित्तानं करण्यात आलं. काहीजण गाफील राहिले असं म्हणायला हरकत नाही", असंही अजित पवार म्हणाले.सहा महिनेआधीच कुजबूज कानावर होती शिंदे गटानं बंडाचं निशाण फडकवलं त्याच्या सहा महिने आधीच माझ्या कानावर याची कुजबुज आली होती असेही अजित पवार यांनी सांगितलं एकदम सुरुवातीला फार सहा महिने आधी म्हणजे जूनच्या आधीच कुजबूज माझ्या कानावर आली होती माझी आणि उद्धव ठाकरेंची दररोज कामा निमित्त बैठक व्हायची त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. आणि त्यांनी माझ्याही कानावर आला आहे मी त्यांना बोलावून त्यांच्याशी बोलून घेतो असं म्हटलं होतं. आमच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यावर मार्ग काढतो असेही ते म्हणाले होते असं अजित पवार म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم