Hanuman Sena News

अभी ये तो झाकी है,अगला स्टेशन बाकी है...





ठाणे : ठाण्यात लोकमान्य नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर याच कार्यक्रमात निशाणा साधला. ‘अभी तो ये झांकी है, अगला स्टेशन बाकी है’, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशारा रविवारी दिला. मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे. रविवारी आव्हाडांच्या मतदारसंघात विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या पक्षप्रवेशावर ट्वीट करणारे काही क्लास लीडर असले तरी जगदाळे हे  मास लीडर असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

Post a Comment

أحدث أقدم