मलकापूर - मलकापूर शहरातील छत्रपती शिवाजी नगर लगत असलेल्या तालुका क्रीडा संकूल येथे दररोज पोलीस भरती व इतर शासकीय भरती आवश्यक असनाऱ्या खेळ धावने ,गोळा फेक लांब उडी इतर सराव करण्यासाठी महिला व मुली येते असतात परंतु काही दिवसापासुन पारपेठ भागातील काही टवाळखोर मुले क्रिडांगनावर येऊन मुलीला बघून विचित्र हावभाव करून त्रास देत आहे. मुली धावण्याचा सराव करीत असतांना जाणून बुजुन क्रिकेट चा चेंडू मारून फेकतात व नंतर टॉटिंग करतात महिला व मूली धावण्याचा सराव करते वेळी त्यांच्या जवळ जाऊन क्रिकेट खेळतात आणि यांच्या क्रिकेट खेळण्याचा कोनताही वेळ नसून हे रोज रात्री 12 वाजेपर्यंत ग्राऊंडवर मोठ मोठ्याने आरडा ओरडा करत असतात तरी महिला व मुलींन सोबत अशा वागणूकी मुळे मलकापूर शहरातील शांतता भंग होण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही तरी. तालुका संकुल अधिकारी यांनी मुलांना क्रिकेट खेडण्या करीताची वेळ तसेच महिला व लहान मुलांना विद्यार्थी मुलींना खेळण्यासाठी टाईम ठरवण्यात यावा जो पर्यंत मुली ग्राऊंड वर असतील त्या वेळेस पुर्ण लाईट (फोकस) हे बंद करू नये.क्रिकेट पेक्षा इतर क्रीडा स्पर्धा मध्ये मुलीची ओढ जास्त आहे तरी आपन मुलींच्या पुढील भविष्याकडे बघून योग्य ती कार्यवाही करून मुलींना देश सेवेसाठी प्रोत्साहीत करण्यात यावे तसेच शाळा-महाविद्यालयाच्या, कोचिंग सेंटर, कॉफी शॉप, बस स्टैंड, चांडक शाळा जवळील चौक परिसरातील मागील काही वर्षा पासून मुलीची छेड काढण्याचे प्रकरणा मध्ये भर पड़त आहे व अशा प्रकरणा मुळे कायदा-सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंन दिवस वाढत आहे. सध्या स्थितीत भारतात प्रति 18 मिनिटाला एक बलात्कार होत आहे.महिलांवरील अत्याचाराची भयावह आकडेवारी या संदर्भातील प्रतिबंधात्मक उपायांची नितांत आवश्यकता दर्शवते.या परिस्थिति रोड रोमियो यांच्या मनात पोलिस प्रशासन यांचे धाक राहावे व अस्या घटनेस आळा व शरातील आई - बहिनी यांचे रक्षना करीता उपविभागीय अधिकारी व मलकापूर शहर पोलिस प्रसाशन यांना निवेदना द्वारे मागणी केली की
1.आपन बस स्थानक, शाळा, कॉलेज, क्रीड़ासंकुल, कोचिंग क्लासेस,कॉफी शॉप अश्या ठिकाणी गस्ती वाढवाव्या.
2. तसेच या ठिकाणी CC-TV कैमरे व महिला तक्रार पेटी (सुचना पेटी ) लावन्यात यावी.
3.महिला व मुली यांच्या समस्या मांडण्या करीता महिला हेल्पलाइन क्रमांक बनवीण्यात यावा.
4.बंद झालेले महिला पोलिस यांचे दामीनी पथक पुन्हा शुरु करावे.
5.चांडक शाळा निकट बंद असलेली पोलिस चौक पुन्हा सुरु करावी.
सदर विषयावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास संघटने द्वारे नाईलाजास्तव कायदेशीर आंदोलन करावे लागेल व पुढील परिस्थिती किंवा परिणामाला आपन जबाबदार रहाल अशी ताकित ही दिली आहे.
सदस निवेदनाची प्रतिलिपी तालुका क्रीडा संकुल अधिकारी,
मा.खासदार रक्षाताई खडसे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या द्वारे देण्यात आली आहे
إرسال تعليق