उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेले लचांड काही केल्या कमी होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ठाकरे गटातील आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हीप लागू होणार आहे, तो जर त्यांनी पाळला नाही तर त्यांची आमदारकी जावू शकते, असा दावा संभाजीनगरचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे आता होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदित्य ठाकरेंनाही भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप लागू होणार आहे.उद्धव ठाकरे गटाकडे 4 खासदार आहेत. त्यापैकी काही आमदार आणि खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 14 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. जर व्हीपची अमंलबजावणी केली नाही, तर निलंबणाची कारवाई होणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनात दोन वर्षे आराम केला. तो यापुढेही करावा, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे सरकार बजावणार व्हीप; पालन न केल्यास आमदारकी होणार रद्द...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق