राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर दिलं. तेव्हा पंतप्रधानांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, त्यांच्या वारसदारांना नेहरुंचं आडनाव लावण्यास काय भिती आहे? का नेहरू आडनाव लावण्यास लाज वाटते, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केसं उभं राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते.पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांनी ‘मोदी-अडाणी’, ‘भाई-भाई’ अशा घोषणांनी संसद दणाणून सोडली. याचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. “काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक आहे. या सदस्यांना मी सांगू इच्छितो की, ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार, तेवढं कमळ उगवणार’. आमच्या यशात तुमचं योगदान विसरणार नाही,” असा टोमणा पंतप्रधानांनी विरोधकांना लगावला.
नेहरूंच्या वारसदारांना आडनाव लावण्यास काय भीती? पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق