खामगाव: तालुक्याच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा तसेच पीकविमा त्वरीत देण्यात यावा, या मागणीसाठी खामगावात बुधवारी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले.खामगाव तालुक्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आली नाही. नुकसान भरपाईत समावेश करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे पीकविमा देण्यात आला नाही.दरम्यान, खामगाव तालुक्याचा नुकसान भरपाईत समावेश करण्यात यावा, पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल पाटील यांनी बुधवारी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या कायार्लयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी प्रसंगावधान राखत शहर पोलिसांनी अमोल पाटील यांना आत्महत्येपासून परावृत्त करून ताब्यात घेतले. त्यांना शहर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या घटनेमुळे प्रशासकीय इमारतीत एकच धावपळ उडाली होती.
अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याचा खामगावात आत्मदहनाचा प्रयत्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق