मलकापुर : आज स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्रजी बोस जयंती पराक्रम दिवस विश्व हिन्दू परिषद बजरंगदल मलकापुर तर्फे साजरा करण्यात आले .यावेळी मलकापुर शरातील प्रसिद्ध व्यापारी विनोद जी राजदेव तर्फे नेताजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तर अशोकजी अग्रवाल यांची विशेष उपस्थिती लाभली या वेळी बजरंगल नगर सहसयोंजक केशव कोन्होळकर यांनी सुभाषचंद्र बोस यांचे देशाच्या स्वतंत्रता मध्ये दिलेले योगदान यांची आठवण करुण दिलीसुभाषचंद्र बोस हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ओरिसाच्या बंगाली कुटुंबात जन्मलेले सुभाषचंद्र बोस हे एका संपन्न कुटुंबातील होते, परंतु त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले होते.यावेळी विश्व हिन्दू परिषद नगर अध्यक्ष दिलीपजी पाटिल,नगर उपाध्यक्ष विशालजी दवे,नगर मंत्री शामसिंहजी हजारी,सेवा विभाग प्रमुख दीपकजी चवरे, बजरंगदलचे पप्पूसिंह ठाकुर, विशालजी पंडित, रमनजी व्यास, मंगेश वासनकार इतर कार्यकर्ता उपस्थित होते.
मलकापूर विश्व हिन्दू परिषद तर्फे नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांची जयंती सजारी करण्यात आली
Hanuman Sena News
0
إرسال تعليق