Hanuman Sena News

वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचाऱ्याला मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...






मलकापूर: धनगरपुऱ्यातील वीज ग्राहकाकडे वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली पारपेठ भागात मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. धनगरपुऱ्यातील टिपू सुलतान चौकात वीज ग्राहक बिस्मिल्ला खान आमिर खान यांच्याकडील थकबाकी वीज बिलाच्या वसुलीसाठी मंगळवारी वीज कर्मचारी गेले असता, त्यांच्या संबंधितांशी संवाद सुरू होता. सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास धनगरपुऱ्यातील दोघांनी हस्तक्षेप केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी वीज तंत्रज्ञ प्रकाश पवार यांची कॉलर पकडून फाडले अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा वाद विकोपाला जात असल्याने असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटने संदर्भात सालीपुरा भाग 1 कंपनीचे वीज तंत्रज्ञान प्रकाश एकनाथ पवार यांनी मलकापूर पोलिसात तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी शेख माजिद शेख मुसा व शेख जावेद शेख उमर अशा दोघांविरुद्ध 353,332,294,506,34नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र सिंह ठाकुर करीत आहेत. घटना घडल्यानंतर वीज बिल वसुली कामाचा भाग आहे.त्यात कर्मचाऱ्यांच्या जिवाचे बरेवाईट होऊ शकते त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वीज कर्मचारी कृत्य समीतीने केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم