मलकापूर: सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्रावर गाजत आहे गायरान जमिनी म्हणजे सरकार अधिकृत अशी जमीन ज्याच्यावर जनावरे चरण्यासाठी जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी सरकारी कार्यालयाकरिता देण्यास राखीव असते त्यावरील ताबा किंवा मालकी हक्क हा फक्त सरकारचाच असतो. अशा जमिनीवर गरीब भूमिहीन राहतात. परंतु समाजातील काही लोक स्वतःच नेते म्हणून घेणारे लोक ह्या लोकांच्या साध्या भोळेपणाचा व त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून आम्ही ही जमीन तुमच्या नावावर करून देतो. असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या मलकापूर,नांदुरा, मोताळा येथे चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2011 च्या आदेशानुसार गायरान जमीन सरकारकडून फक्त भाडेतत्त्वावर मिळते ती कोणाच्याही नावावर होत नाही त्याची शासन दरबारी 1 इ फॉर्मवर नोंद होते. म्हणजेच या जमिनीवर अतिक्रमण झाले याची सरकारी दप्तरी नोंद होते. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे शाळा हॉस्पिटल ते सरकारी असेल तरच गायरान जमीन वापरता येईल. हस्तांतर तर मुळीच होणार नाही. तसेच गायरान जमीन नावावर होण्याचा कोणताही कायदा नाही तरीही भोळ्या भाबड्या अशिक्षित लोकांकडून पैशांची होणारी लूट या समाज घातक लोकांकडून थांबविण्यात येईल काय? असा प्रश्न आहे . प्रशासन साखर झोपेतून जागी होऊन या लोकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याचा प्रयत्न करेल काय? गोरगरीब जनतेने निवडणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. त्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडू नये सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करणे आपल्या पाठीमागे मिरवून स्वतःच्या पुढारीपणाचा देखावा करणे व पैशांची लुबाडणे करणे असले उद्योग मलकापूर नांदुरा मोताळा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू असून अशा फसवेगिरी करणाऱ्यांची संबंधित पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार करावी असे, आवाहन भाजपा दलित आघाडीचे कुणालभाई सावळे यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
गायरान जमिनीच्या नावाखाली मलकापूर, नांदुरा, मोताळा परिसरात मोठ्या प्रमाणात फसवेगिरी करणाऱ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा- कुणाल सावळे...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق