बुलढाणा: लव जिहाद धर्मांतर बंदी कायद्याच्या मागणीसह गोहत्या व महापुरुषांचा अवमान या विरोधात बुलढाण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान विविध घोषणांनी शहर दणाणून गेले बुलढाणा येथील संगम चौकातून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चेकर्यांनी विविध घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला . जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना मोर्चात वारकऱ्यांनी सहभाग घेतला हा मोर्चा स्टेट बँक चौकात पोहोचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले मोर्चात हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई आमदार संजय गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्म जागर प्रमुख अटल पांडे, बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष केशव बेंडवाल, आर्ट ऑफ लिविंग चे आदित्य पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील समाज बांधव सहभागी होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ.तुम्मड यांना निवेदन देण्यात आले यावेळी धर्म स्थित राज सत्तेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे देसाई म्हणाले जिहादी देशद्रोही कारवायामुळे आपल्या देशाचा सर्वाधिक पैसा या संरक्षणावर खर्च होतोय तेव्हा त्याचा विमोड करून राजसत्तेसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच धर्माचा प्रचार- प्रसार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले व या सोबतच वर्तमान राजकीय परिस्थितीसह अन्य बाबींचाही त्यांनी उहापोह केला मोर्चादरम्यान अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता.सदगुणांची विकृती झाल्यामुळेच हिंदूचा पराभव झाला. अहिंसा परमोधर्म हे आम्हाला अर्धवट शिकवले गेले मात्र धर्मासाठी केलेली हिंसा ही यांच्या पेक्षा श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे म्हणायला अजित पवारांना लाज कशी वाटली नाही संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि धर्मप्रेमी असण्याबद्दल औरंगजेबाला सुद्धा संशय नव्हता असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला प्रत्येक हिंदू ने आपल्या जातीचा अहंकार न जपता हिंदू असल्याचा अभिमान बाळगावा फांद्याचा अहंकार न जपता मुळाचा अभिमान बाळगा असे ते म्हणाले.मुलांनो तुमचा विवेक जागा ठेवा तुमचे कौतुक करणारा प्रत्येक मुलगा तुमच्यावर प्रेम करेलच असे नाही तर त्यातील काही अफताब सुद्धा असू शकतात. लव जिहाद हे मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. त्यापासून आपल्या लेकींना वाचवा लव जिहाद करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे व गोहत्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे सांस्कृतिक दृष्ट्या भारत हिंदू राष्ट्र आहेच मात्र राजकीय स्तरावर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशा आमच्या मागण्या असल्याचे धनंजय देसाई म्हणाले. लोकसंख्येचा वाढता असमतोल हिंदू समाजापुढील मोठे आव्हान आहे 1947 ला सगळे मुसलमान तिकडे पाठवायला पाहिजे होते हे बाबासाहेब सांगत होते मात्र तेव्हा बाबासाहेबांचे ऐकल्या गेले नाही त्याचा परिणाम आता हिंदू समाजाला भोगाव लागत आहे हिंदू समाजाने जात-पात भेदभाव विसरून एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मजागरण प्रमुख अटल पांडे यांनी केले लव जिहाद हे हिंदू समाजाला लागलेली मोठी कीड आहे आतापर्यंत लव्ह जिहादला बळी पडलेल्या 222 मुली आपण हिंदू धर्मात परत आणले आहे मी नखा पासून तर डोक्याच्या केसापर्यंत हिंदुत्ववादी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या असे कृत्य करणाऱ्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले सभी पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हिंदू जन आक्रोश मोर्चा घोषणांनी बुलढाणा शहर दणाणले
Hanuman Sena News
0
إرسال تعليق