Hanuman Sena News

मावशीच्या नवऱ्याने विकृत नजर फिरवली; आणि त्याने तिच्या सोबत नको तेच केले...




चिखली: लोकांना लाज कशी वाटत नाही असले धंदे करायला बातमी वाचल्यावर तुमच्याही तोंडून हे उद्गार बाहेर पडतील. चिखलीच्या गजानन नगरात राहत असलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला. मुलीच्या मावशीच्या नवऱ्याची विकृत नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिच्या सोबत नको तेच केलं. अखेरी पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनीही तातडीने तपासाला गती देत आरोपी काकाला बीड जिल्ह्यातल्या गेवराई येथून ताब्यात घेत अटक केली. पीडित मुलगी चिखली शहरातील गजानन नगर भागात राहते मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार 1 सप्टेंबर 2022 ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी हा नात्याने मुलीचा काका असल्याने ओळखीचा गैरफायदा आरोपीने घेतला.ओळखीतून जवळीक वाढवून तो अनेकदा मुलीला भेटायला चिखली मुलीच्या घरी यायचा मात्र नातेवाईक असल्याने कोणाला संशय यायचा प्रश्नच नव्हता. दरम्यान एक दिवस आरोपी काकाने मुलीला मोटरसायकलवर बसून बुलढाणा येथे नेले तिथे एका लॉजवर मुलीला नेत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामीची धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने मुलीने घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. आणि 23 जानेवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी काका मुलीच्या शाळेसमोर आला त्याने मुलीला गाडीवर बसून बाजूला नेत ओढणी काढून मुलीला जवळ ओढले असेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे. घडलेला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यावर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार, पोस्को, व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांनी तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्या हाती देत वेगवान तपासाच्या सूचना दिल्या. 26 जानेवारी रोजी आरोपी बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली. 27 जानेवारीला आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे करीत आहे

Post a Comment

أحدث أقدم