बुलढाणा: छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी प्राण दिला ते धर्मवीर म्हणून ओळखल्या जातात परंतु अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य विधानसभेत केल्याने महाराजांचा अपमान झाला असे म्हणत भाजपा भटके विमुक्त महिला बुलढाणा जिल्हा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश दारावर निदर्शने करण्यात आले. यावेळी अजित पवारांच्या बॅनरला महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला स्वराज्य निर्माते छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी प्राण त्यागले महाराजांना धर्मवीर म्हणून ओळखले जाते. मात्र अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हते असा विनाकारण दावा करून वातावरण गढूळ केले आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आल्याचे भाजपा भटके- विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रंजनाताई बोरसे म्हणाल्या या आंदोलनात सौ रंजनाताई बोरसे, सौ मंगलाताई दिवनाले ,सौ सपना ताई भालेराव, सौ संगीताताई येऊल,सौ संगीता ताई वरखेडे ,सौ कविताताई राठोड व भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
बुलढाणा अजित पवारां विरोधात जोडे मारो आंदोलन! भाजपाच्या भटके- विमुक्त महिला जिल्हा आघाडीने केला निषेध....
Hanuman Sena News
0
إرسال تعليق