गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने आसाराम बापूला एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हा सुद्धा या प्रकरणात आरोपी होता. आसारामची पत्नी लक्ष्मी मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं पण गांधीनगर न्यायालयाने संबंधित सर्वांना निर्दोष मुक्त केलं आसाराम बापू सध्या जोधपुर तुरुंगात असून उद्या त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितलं होतं.सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना तिच्यावर बलात्कार झाला असं पीडित मुलीने सांगितलं होतं. दुसरीकडे मोठ्या बहिणीने तक्रारीत आसाराम वर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसाराम ने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचं पिडीतेनं सांगितले दोन्ही बहिणींनी पिता-पुत्रांच्या विरोधात स्वतंत्र तक्रार केल्या आहेत. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे 2018 मध्ये जोधपुर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेमीची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये जोधपूरच्या आश्रमात सोळा वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.
अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू दोषी न्यायालयाचा मोठा निर्णय...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق