मलकापूर: आजकालच्या काळामध्ये जगभरामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.पण तरी भारत देशाचा विचार केला तर आजही लाखो महिला केवळ गृहिणी म्हणून जगत आहेत. वाढत्या आजकालच्या महागाईमुळे घर खर्च चालवण्यासाठी महिला पुरुष दोघांनाही नोकरी करावी लागत आहे.मात्र अनेक महिला घरातील जबाबदारीमुळे घराबाहेर पडून नोकरी व उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत. घरातील खर्चाला देखील हातभार लावावा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे अशी अनेक महिलांची इच्छा असते त्याचीच अवचित साधून आज दि 19/1/23 ला अरिहंत महिला गृह उद्योग संताजी नगर मलकापूर यांनी पापडाचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याच्या उद्घाटनास भाजपा तालुका महिला अध्यक्ष सौ अश्विनीताई काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांची उपस्थिती लाभली याप्रसंगी अश्विनीताई काकडे यांनी महिलांना गृह उद्योगाबद्दल स्वयंरोजगार उपलब्ध झाला पाहिजे . घरातील खर्चाला हातभार लागतो आणि आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम राहते याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अरिहंत महिला गृह उद्योगाचे अध्यक्ष मेघाताई सैतवाल,पूजाताई शेलोकार ,अर्चनाताई मेतकर, दिपालीताई तायडे, नीताताई गावंडे, मंगलाताई खर्चे, उषाताई चोपडे, भारतीताई निर्खे, शितलताई वर्मा ,लताताई केने, विद्याताई खर्चे, प्रभावतीताई सैतवाल, चंदाबाई चंदनशिव, मुकेशजी भंडारी, मधुकर भाऊ तायडे, राजेंद्र सैतवाल,प्रशांत पाटील, विशाल पाटील इत्यादी उपस्थित होते
स्वयंरोजगार अरिहंत महिला गृह उद्योगाचे शुभारंभ संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق