केज : बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली आहे. या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्या. दरम्यान, एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला, त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 6 जून 2022 रोजी घडली होती. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
नायब तहसीलदाराला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق