मलकापूर: मकर संक्रांतीचा सण येत्या 15 जानेवारीला सर्वत्र साजरा होत आहे मकरसंक्रांतीसाठी लागणाऱ्या वाणासह विविध साहित्य यंदा चांगलेच महागले आहे. भोगीच्या दिवशी 14 जानेवारीला बाजार फुलला होता मकर संक्रांतिवर ही महागाईचे सावट असले तरी खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली मकर संक्रांत हा सण महिलांसाठी महत्त्वाचा आहे. मागील वर्षापेक्षा यंदा दरांमध्ये वाढ झाली आहे .पॉलिश केलेले तीळ बाजारातील किराणा दुकानात दोनशे रुपये किलो, बिगर पोलीस तिळ 160 रुपये ,गुळ 50 रुपये, शेंगदाणे 150 रुपये, चिक्कीचा गुळ 60, मुरमुरे 40 रुपये पायली, तयार तीळ गुळाचे लाडू 280 रुपये किलो आहेत. मकरसंक्रांती सणावर वाढत्या महागाईचे सावट असले तरी वर्षातून एकदा येणारा सण साजरा करण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. महिला वर्गाची तिळगुळ बनवण्यासाठी विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग बाजारात बघावयास मिळाली मात्र यंदा विविध भागात वाढ झाल्याने सर्वसामान्य महिलांचे बजेट वाढले मात्र वर्षातील पहिला आणि महिलांचा आवडता सणाला महिलांनी खरेदी केली.
मकर संक्रांति वर महागाईचे सावट...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق