औरंगाबाद: भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. भाजपने मिशन 144ची सुरुवात केली आहे. आजपासून या मिशनला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा औरंगाबादमध्ये येत आहे. औरंगाबादमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होत आहे. मात्र,मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून मुंडे भगिनींना डावलण्यात आलं आहे. जेपी नड्डा यांची आज औरंगाबादेत सभा होत असून या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं असून आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंडे भगिनींचा काहीच रोल नसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उपेक्षा सुरूच आहे. मराठवाड्यात होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांना वगळण्यात आलं आहे.विशेष म्हणजे केवळ पंकजा मुंडे यांनाच नाही तर त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनाही या कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. दोन्ही मुंडे भगिनींचं नावच कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. तसेच भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे.औरंगाबादमध्ये कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाला मराठवाड्यातील नेत्यांना पाचारण करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. मात्र,मराठवाड्याच्या नेत्या असूनही पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.मराठवाडा संस्कृतीच्या मंडळाच्या मैदानावर आज दुपारी चार वाजता जीपी नड्डा यांची सभा होणार आहे या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आमदार हरिभाऊ बागडे आमदार प्रशांत बंब भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आधी उपस्थित राहणार आहेत.या सभेनंतर नड्डा भाजपाच्या लोकसभा 300 साधून औरंगाबाद साठी रवाना होतील या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित राहतील मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितले जात आहे.
आज होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे पत्ते कट...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق