Hanuman Sena News

​आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत:38 हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, मेट्रो रेल्वेच्या दाेन मार्गिकांचे हाेणार लोकार्पण..


मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन होणार आहे. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हे कार्यक्रम होतील. कर्नाटकातील विविध विकासकामांचे उद‌्घाटन करून मोदी मुंबईत येणार आहेत.मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण, मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या २० शाखांचे लोकार्पण, ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, मनपाच्या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन, ४०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आदी कार्यक्रम मोदींच्या हस्ते होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होतील.

Post a Comment

أحدث أقدم