Hanuman Sena News

RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पहावे, टाचण्या अन् लिंबू.." , उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सल्ला..!






मुंबई: शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे. मिंधे गट काल मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेला, ही वृत्ती अतिशय घाणेरडी आहे. आज ते RSS च्या कार्यालयात गेलेत. मग उद्या ते त्यावरही कब्जा करणार का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. "स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते तो असं चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचं ओरबाडण्याचं काम करतो. पक्ष चोरायचा, नेते चोरायचे हे असलं काम तेच लोक करतात. काल मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. आज मुख्यमंत्री RSS च्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण जे भेट घ्यायला आले होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना", असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.    

Post a Comment

أحدث أقدم