Hanuman Sena News

शिंदे - फडणवीस सरकार बोम्मईच्या दबावापुढे का झुकतय ? राष्ट्रवादीचा सवाल...





कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितल्याचे म्हटले होते. तशातच आता मंत्र्यांचा कर्नाटक दौराही रद्द झाल्या. त्यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सवाल उपस्थित केला."शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दबावाला बळी पडताना पाहून आश्चर्य वाटते. बातम्यांनुसार स्पष्टपणे कळत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा वादावरील न्यायालयीन खटल्याबाबत कायदेतज्ज्ञांशी भेटण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमेवरील अशांततेची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना येऊ नका, असे सांगितले. पण अशी अशांततेची परिस्थिती त्यांच्याच वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे मंत्री फक्त महापरिनिर्वाण दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त बेळगावला जाणार होते. परंतु मंत्री त्या दिवशी तिथे गेले तर अशांतता निर्माण होऊ शकते म्हणून ही भेट आता रद्द केली आहे. हा न्यूटन का त्यांच्या सरकारला त्या दिवसाचे महत्त्व माहिती नव्हते का भेटीची घोषणा करण्यापूर्वी त्यांना शांतता भंग होऊ शकते याची जाणीव नव्हती का असे सवाल क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केले.सत्य हे आहे की मुंबई यांच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागत आहे एका भाजपच्या मुख्यमंत्र्याला दुसऱ्या भाजप पुरस्कृत राज्यात भाजप मनमानी करू देत आहे आणि केंद्र सरकार व भाजप मुख्य प्रक्षेप बनवून बघत आहेत ही लज्जास्पद बाब आहे भाजपाच्या या विचित्र वागण्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे की... जसे दिसत आहे त्यापेक्षा काही अधिक असण्याची शक्यता तर नाही ना अशी खोचक टीका देखील क्लाईड यांनी केली

Post a Comment

أحدث أقدم