महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाने मंगळवारी गंभीर वळण घेतले. बेळगावच्या चौकात कन्नड वेदिकेच्या गंुडांनी लोळण घेत वाहने अडवली. हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या ६ ट्रकची तोडफोड केली. बसेसच्या छतावर चढून कानडी झेंडे फडकावले. या वेळी त्यांना विरोध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, सीमा भागात कन्नडिगांची हडेलहप्पी सुरू असताना राज्यात शिंदे सरकारचे मंत्री नुसतेच निषेध करून इशारे देत होते. याउलट राष्ट्रवादी-शिवसेनेसह सर्वच विरोधक आक्रमक होऊन कर्नाटक सरकारवर तुटून पडले होते. इकडे, कर्नाटकची सीमा आणि कन्नडिगांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूत बोलताना सांगितले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मंगळवारी दिवसभर बेळगाव प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही. वर्षा निवासस्थानी त्यांनी आपल्या गटाच्या मंत्र्यांची बैठक घेतल्याचे समजते. परंतु मुख्यमंत्री पडद्यामागेच राहिले. उपमुख्यमंत्री फडणवीस हेच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. सीमेवर कन्नडिगांनी घातलेल्या धुमाकुळीचे संतप्त पडसाद कोल्हापूर, पुण्यात उमटले. कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेळगाव सीमेवर धाव घेतली. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला असताना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकातील बसेसच्या काचेवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून गाड्यांना काळेही फासले. दरम्यान सीमावाद पेटला असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी दुपारी कर्नाटककडे जाणाऱ्या आपल्या एसटी बसेस रद्द केल्या आहेत ४८ तासांत हल्ले थांबले नाही तर मला बेळगावला जावे लागेल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. मराठी भाषिकांमध्ये सतत दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन वातावरण सुरळीत करण्याची गरज होती. उपमुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असे त्यांनी स्वतः सांगितले. चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही.सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित यावे महाराष्ट्राची भूमिका ठरवताना सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. बुधवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रितपणे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या कानावर घातली पाहिजे.कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी बेळगावात घातलेल्या धुमाकूळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी आपण दूरध्वनीवर लगेचच चर्चा केली आणि या घटनांबद्दल त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांसंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे,असे फडणवीस म्हणाले.महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातमध्ये हलवणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इतर भाजप नेत्यांनी केलेली अवमानकारक वक्तव्ये यामुळे भाजपबाबत निर्माण झालेली संदिग्धता या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीही सीमाप्रश्न उकरून काढला गेल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिले आहेत. त्यामुळेही कर्नाटकचे धाबे दणाणले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादाला खतपाणी घालत आहेत.वक्तव्यांमुळे सीमाभागातील परिस्थिती गंभीर बनली असून यावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. अशा वेळी केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ बोम्मई सीमाप्रश्न आणि पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका याचा संबंध नाही. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र हा मुद्दा उकरून काढतो आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले
बेळगाव मध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला बोम्मईंची चितावणी खोर वक्तव्य...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق