नांदुरा: भारत देश म्हणजे संतांची भूमी होय. आपल्याला संतांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. संतांनी आपल्याला त्यांच्या अभंग, दोहे, किर्तन इ. मधून अनमोल असा संदेश दिलेला आहे. संत म्हणजेच ईश्वरप्राप्तीचा मार्ग! "साधू - संत येती घरा तोचि दिवाळी दसरा!" ही म्हण आपल्या देशात रुजलेली आहे या म्हणीवरून असे लक्षात येते कि संतांचा सहवास लाभणे कुठल्या सण -उत्साहापेक्षा कमी नाही.काल ३० नोव्हेंबर म्हणजेच श्री. संत रविदास महाराजांची पुण्यतिथी होय. संत रविदास महाराजांनी जनतेला आपल्या कविता, दोहे इ. मधून बहुमोल असा संदेश दिला. त्यांची परमेश्वरावर खुप भक्ती होती. बऱ्याच धर्मग्रंथामध्ये त्यांच्या ओव्या, कविता, अभंग आहेत. संत रविदास एक महान संत होवून गेले. संत रविदास यांची पुण्यतिथी बुलढाणा रोड वरील समाज मंदिरात आज गुरुवार दि. ०१/१२/२०२२ रोजी साजरी करण्यात आली.सौ. ज्योतीताई तांदळे, बेटी बचाओ बेटी पढाओ संचालिका आणि सौ. प्रज्ञाताई तांदळे, बाळासाहेबांची शिवसेना शहर उपप्रमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.पदाधिकारी महिला व उपस्थित सर्व महिलांनी संत रविदास महाराजांना आदरांजली वाहिली.सौ सरिता ताई बावस्कार
सौ भावना सोनटक्के
सौ विजया गोरे
सौ मंगला ताई सपकाळ
सौ रुपाली घोपे
सौ वनिता गव्हाळे
तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या ,
शेवटी प्रसाद देऊन कार्यक्रमाची ची सांगता करण्यात आली.
___
إرسال تعليق