महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. विविध तालुक्यांमध्ये जाऊन ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सोमवारी त्यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मोठं विधान केलं आहे. कुणी तुमच्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या. त्यांनी हात उचलला तर तुमच्याकडूनही हात उचललाच पाहिजे. मी वकिलांची फौज उभी करतो, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, “जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी तीन सभा घेणार आहे. मुंबई, कुडाळ आणि चिपळून येथे या तीन सभा होणार आहेत. हा संपूर्ण दौरा पक्षाची घट्ट बांधणी करण्यासाठी होता. कोकणातले आपले कोकणवासीय आणि मुंबईस्थित कोकणवासीय यांच्यात मिलाप व्हावा, हा कोकण दौऱ्याचा हेतू होता.मुंबईत गेल्यावर माझ्या काही बैठका होतील. पक्ष जितका घट्ट बांधता येईल, तितका घट्ट बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो. लवकरच तुमच्यापर्यंत काहीकार्यक्रम येतील हे कार्यक्रम राबवत असताना कुणाचीही परवा करू नका कोणत्याही दुसऱ्या पक्षाची परवा करू नका कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्या मी वकिलांची फौज उभी करेल हे मी तुम्हाला मुद्दामहून आत्ताच सांगतोय असंही राज ठाकरेंनी नमूद केलं आहे राज ठाकरे पुढे म्हणाले समोरचे जसे वागतील तसंच आपण वागायचं त्यांनी हात उचलला तर आपल्याकडूनही हातच उचलला गेला पाहिजे आणखी ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी उघडपणे बोलू शकत नाही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत बोले
अंगावर आले तर शिंगावर घ्या वकिलांची फौज उभी करतो राज ठाकरेंचा मनसैनिकांना थेट आदेश...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق