बुलढाणा: जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 279 ग्रामपंचायत साठी उमेदवारी अर्जाची छाननी नंतर 7 डिसेंबर रोजी माघार घेण्याची मुदत आहे दुपारी 3 वाजल्यानंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. थेट सरपंच पदासाठी तसेच सदस्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने माघार घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. छाननी नंतर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 1339 तर सदस्यांसाठी 5150 उमेदवार रिंगणात राहिले आहेत मुदत संपलेल्या 279 ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे .उमेदवारी अर्जाची 5 डिसेंबर रोजी छाननी करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच पदाचे 16 अर्ज तर सदस्यांसाठी 85 अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे .अर्जाची विक्रमी संख्या पाहता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजीची मनधरणी सुरू केली आहे. थेट सरपंच पदासाठी अनेकांनी तयारी केल्याने अर्जाची संख्या वाढली आहे. उमेदवारांच्या माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी नंतर दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडणार आहे. कडाक्याच्या थंडीत राजकीय शेकोटी पेटणार आहे. थेट सरपंच बरोबरच पॅनल मधील सदस्य ही विजयी होण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांची वर्दळ वाढणार आहे .तसेच ग्रामपंचायतीसाठी 190 मुक्त चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ही निवडणूक पॅनलच्या माध्यमातून लढण्यात येते. राजकीय पक्ष नसल्याने मुक्त चिन्हांवरच गाव पातळीवरील उमेदवार निवडणूक लढवितात.
उमेदवारी अर्ज माघारी नंतर आज ठरणार लढतीचे चित्र...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق