अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे प्रकरण नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आले. नागपूर अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण देशभर गाजले. त्यातच दिशा सालियनने आत्महत्या झाली. त्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. सुशांतसिंहचे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. सीबीआयने तपास पूर्ण केला. त्यात दिशाच्या मृत्यूचाही तपास करण्यात आला. ज्या रात्री तिचा मृत्यू झाला, त्या रात्री तिने अल्कोहोल प्राशन केले होते. त्यात तिचा तोल गेला आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला. असा अहवाल सीबीआयने दिल्याच्या बातम्या छापून आल्या.बिहारच्या निवडणुका होऊन गेल्या. दोन वर्षांच्या कालावधीत बिहारमध्ये नितेश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या एका गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे होत भाजपसोबत सरकार स्थापन केले. मधल्या काळात दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीवरून राजकारण करू नका. तिच्या मृत्यूनंतर तरी तिची बदनामी थांबवा, असे जाहीर आवाहन केले. एवढे सगळे घडूनही दिशा सालियन प्रकरण संपायचे नाव घेत नाही.नागपूर अधिवेशनात विरोधकांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे प्रकरण काढले. विधानसभेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चेंबूरच्या खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे समजताच चौकशीचे आदेश दिले. या सगळ्यांवर शह-काटशह देत पुन्हा एकदा दिशाचे प्रकरण पुढे आणले गेले. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा झाली. नव्या दमाचे अधिकारी डॉक्टर्स आणले पाहिजेत कोणाचे बिल थकले आहे त्यासाठी किती टक्के रोग दिले पाहिजे याची उघड चर्चा होत आहे आरोग्यमंत्र्याच्या कानावर या गोष्टी येत नसतील असे नाही त्यांच्या नावावर कोण दुकान चालवत आहे हे पाहायला पाहिजे जर असे झाले नाही तर राज्याची दिशा भरकटून जाईल दिशा स*** यांचे काय व्हायचे ते होऊन गेले त्यावरून राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याची अन्न वस्त्र निवाराची दिशा ठरवा ते जास्त महत्त्वाचे आहे सदैव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस संवेदनशील आहेत त्यांना विषयाची जाण आहे दोघांनी आता कंबर कसून सगळ्यांना कामाला लावले पाहिजे तर आणि तरच नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल
जनतेला 'दिशा' दाखवा, नाहीतर ती 'दशा' करेल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق