पुणे: राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमादरम्यान केला होता. त्यानंतर आथा पुन्हा त्यांनी आपण संधी द्यायला तयार आहोत, राजकारणात या असं आवाहन केलं आहे.“बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर मी महाराष्ट्राला आवाहन करु इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा राजकारणात या.. मी संधी द्यायला तयार आहे,” असं राज ठाकरे म्हणाले. राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचं असं चित्र सध्या झाला आहे ते बदलणं तुमच्याच हातात आहे असं पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेत "नवं काहीतरी" या विषयावर आयोजित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यात राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले होते.
राजकारणात या... मी संधी द्यायला तयार आहे- राज ठाकरे...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق