Hanuman Sena News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जाची मुभा...






ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तारखा वाढवा, ऑफलाइन अर्ज स्वीकारा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने तातडीने ही मागणी मान्य केलीय.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरायची मुदत उद्या संपतेय. सध्या महाराष्ट्रात साडेसात हजारांच्यावर ग्रामपंचायतींची निवडणूक सुरूय. त्यामुळे गावशिवारातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगाला पत्र दिले. या पत्रात ते म्हणतात की, राज्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवार अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तथापि, सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत उद्या 2 डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता आहे.आयोगाने उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश आज तातडीने कार्यालयीन कामकाज सुरू होईपर्यंत द्यावा.
आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवून 3 डिसेंबर 2022 पर्यंत करावी.
'राष्ट्रवादी'चेही पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही ऑफलाइन अर्ज स्वीकारावे आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र लिहून ही मागणी केलीय.विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्यासार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पारंपारिक पद्धतीने ऑफलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुबा दिली आहे तसेच अर्ज सादर करण्याची मुदत दोन डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी दिली मदान म्हणाले की निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7751 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देशिनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यात आता अंशतः दुरुस्ती करून नामनिर्देशन पत्र पारंपारिक ऑफलाइन पद्धतीने दोन डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेपाच पर्यंत सादर करता येतील.

Post a Comment

أحدث أقدم