दिल्ली: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली होती. यादरम्यान, काही लोकांच्या जमावाने वाहनावर हल्ला केला.व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये एकाच्या हातात तलवार दिसत होती त्याने पोलीस गाडीवर तलवारीने वार केले आणि त्यांचा दरवाजा उघडला पण तेवढ्यात पोलीस तिथे आली आणि त्यांनी बंदूक काढली यावेळी हल्ल्यावर म्हणाले त्याला बाहेर काढा आत्ताच मारू... पोलिसांच्या सतर्कतेमुळे अफताब चा जीव वाचला .यावेळी नाराज जमावाने पोलीस व्हॅनवर दगडफेकही केली यावेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारे लोक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन काढले आणि आफताबला सुरक्षित नेले.
आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق